मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) आज आईचा खून (Murder) करून तिच्या मृतदेहाचा काही भाग खाणार्या मुलाच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर (Death Penalty) शिक्कामोर्तब केले आहे. कोल्हापूर कोर्टाने (Kolhapur Court) देखील या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा दिली होती. हे खून प्रकरण 2017 मधील आहे.
रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण या न्यायाधीशांनी मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या शिक्षेमध्ये बदल करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण अतिदुर्मिळ प्रकरणांपैकी एक असल्याने त्यामध्ये ही फाशीची शिक्षा कायम ठेवली जात आहे असे ते म्हणाले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने आज केलेल्या सुनावणीमध्ये आपलं मत मांडताना आरोपीने केवळ आईचा खून केलेला नाही तर त्याच्या पश्चात शरीरातून मेंदू, हार्ट, लिव्हर, किडनी, आतडी काढून शिजवून खाल्ल्याचं म्हटलं आहे. खंडपीठाने माहिती देताना या प्रकरणातील आरोपी जेल मध्येही अशाप्रकारचं कृत्य करू शकतो त्यामुळे फाशी पेक्षा कमी शिक्षा दिली जाऊ नये. असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. "त्या आईने जे दुःख अनुभवले ते शब्दात सांगता येणार नाही. दारूची हौस भागवण्यासाठी त्याने हा गुन्हा केला आहे. त्याने बळजबरीने आपल्या आईचे जीवन संपवले, हा मातृत्वाचा टोकाचा अपमान आहे,” असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश कृष्णाजी जाधव यांनी निरीक्षण नोंदवले आहे.
35 वर्षीय सुनील कुचकोरवी या आरोपीने 28 ऑगस्ट 2017 रोजी त्याच्या 63 वर्षीय आई यल्लमा रामा कुचकोरवी यांची कोल्हापूर शहरातील त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या केली. त्यानंतर काही अवयव त्याने काढून शिजवले. नक्की वाचा: Kolhapur Shocker: चालत्या बस मध्ये सासू-सासर्याने गळा आवळून जावयाला संपवलं; CCTV फूटेज मधून झाला उलगडा .
आईने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागात त्याने ही हत्या केल्याचं म्हटलं आहे. कोल्हापूर कोर्टाने 2021 मध्ये फाशीची शिक्षा दिली आहे. सध्या आरोपी पुण्याच्या येरवडा जेल मध्ये आहे. आरोपीने आपल्या फाशीच्या शिक्षेला कोर्टात आव्हान दिले होते.