शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दादर पोलिसांनी (Dadar Police) 31 ऑक्टोबरला (October) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. यापूर्वीही त्यांना समन्स बजावण्यात आला असुन 29 ऑक्टोबरला हजर राहण्याचे देश देण्यात आले होते. पण त्यादिवशी हजेरी न लावल्याने आता पेडणेकरांना पुन्हा एकदा नव्याने समन्स (Summons) बजावण्यात आला आहे. तरी भाजप नेते किरिट सोमय्या (BJP Leader Kirit Sommaiya) यांनी पेडणेकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत. एसआरएच्या (SRA) एका नाही तर अनेक घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांचा हात असल्याचा आरोप करत किरिट सोमय्यांनी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. किशोरी पेडणेकरांविरोधातील तक्रारीबाबत आज कागदपत्र किरिट सोमय्यांनी सादर केली आहे. किशोरी पेडणेकरांविरुद्ध किरीट सोमय्यांची आक्रमक भूमिका घेतल्याने आता किरिट सोमय्यांच्या पुढील निशाण्यावर किशोरी पेडणेकर आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.
एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती अशी माहिती किरिट सोमय्या कडून देण्यात आलेली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. तरी आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये हा घोटाळा योग्यरित्या पुढे येईल अशी अपेक्षा किरिट सोमय्यांनी व्यक्त केली आहे. किशोरी पेडणेकरांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावी अशी मागणी आता सोमय्यांनी केली आहे. (हे ही वाचा:- Aditya Thackeray: शिवसेना आमदार आदित्य ठाकरेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी)
#KishoriPednekar indulged into FORGERY & FRAUD to grab SRA Flats at Gomata Janata SRA Worli. Her Family Member Mr Kadam signed/forged documents in Name original Beneficiary/Allottee Mr Andari
Complaint along with Documents Evidences submitted to
@Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/mNYBSUwNqN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 30, 2022
तरी आता संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक या महाविकास आघाडी नेत्यांनंतर आता किशोरी पेडणेकरांमागेही ईडीचा ससेमिरा लागेल का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दादर पोलिसांनी (Dadar Police) 29 ऑक्टोबरला हजर राहण्याचे देश देण्यात आले होते. पण त्यादिवशी हजेरी न लावल्याने किशोरीताई चौकशीला का घाबरताय? असा सवाल किरिट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांविरोधात उपस्थित करत टीका केली आहे.