Kirtikumar Shinde Resigns From MNS: राज ठाकरे यांनी महायुती ला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच कीर्तिकुमार शिंदेंचा 'मनसेला अलविदा!'
MNS | Twitter

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढी पाडवा मेळावा मध्ये काल त्यांनी मनसे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. या घोषणेनंतर पक्षांत अनेकांची नाराजी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे निकटवर्तीय, मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी राज  ठाकरेंच्या राजकीय भूमिकेला नापसंती दाखवत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा आणि आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी फेसबूक वर पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो पोस्ट करत त्यांनी अलविदा मनसे म्हटलं आहे.

कीर्तीकुमार शिंदे यांनी पोस्ट मध्ये 'आज ५ वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतील. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?' असा सवाल विचारला आहे.  ', प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही.'असेही त्यांनी पोस्ट मध्ये लिहलं आहे.  (हेही वाचा, MNS Gudi Padwa 2024 Melava: कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं स्पष्ट).

कीर्तिकुमार शिंदे यांची पोस्ट

राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थ वर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिल्याचं म्हटलं पण वाटाघाटींचं राजकारण जमणार नाही त्यामुळे तरूणांच्या देशाकडून असलेल्या अपेक्षा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याचं म्हटलं आहे.