खोपोलीत रेल्वेखाली गेलेल्या तरुणाचा सुदैवाने जीव बचावला
Western Railway (Photo credits: PTI)

मुंबई ही घड्याळ्याच्या काट्यावर चालते असे म्हटले जाते. त्यामुळे या  मायनगरीतील लोकल तरी कशा पाठी राहतील. मात्र लोकलचा निष्काळजीपणाने केलेला प्रवास हा जीवावर बेतण्याची शक्यता फार असते. असाच एक प्रकार 23 डिसेंबर रोजी खोपोली रेल्वे स्थानकावर घडला आहे.

अमित शेडगे हा खोपोलीहून रेल्वे पकडण्याच्या घाईत होता. त्यावेळी रेल्वेच्या काही कारणामुळे त्याला लोकल पकडता आली नाही. यामुळे अमित हा रेल्वेरुळ आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला आणि रेल्वे तशीच चालू राहिली. मात्र रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाने त्याचा हात पकडून ठेवला होता. तर अमितच्या अंगावरुन रेल्वे चालतच होती तरीही रेल्वेस्थानकावरील प्रवाशाने त्याचा हात धरुन ठेवत त्याचे प्राण सुदैवाने वाचविले आहे.

या धक्कादायक घटनेप्रसंगी अमितला रेल्वे अंगावरुन गेल्यानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.मात्र रेल्वेस्थानकांवर वारंवार प्रवाशांना सुखरुप प्रवास करावा अशा सुचना दिल्या जात असतात. तरीही अशा पद्धतीचे प्रकार घडने हे निष्काळजीपणाचे लक्षण सध्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे.