कोकणामध्ये जलद आणि स्वस्तात पोहचण्याचा एक पर्याय म्हणजे कोकण रेल्वे (Kokan Railway). परंतू काल (27 जानेवारी ) करमाळी ते सीएसएमटी (Karmali-Mumbai special train) या कोकण रेल्वेच्या मार्गावर सुदैवाने एक मोठा अपघात टळला आहे. अचानक कणकवली (Kankavali) स्थानकाजवळ या रेल्वेचं इंजिंन डब्यापासून वेगळं झालं. मात्र काही वेळातच इंजिन पुन्हा डब्याला जोडण्यात यश आल्याने मोठा अपघात टळला.
सध्या कोकणमार्गावर करमाळी ते सीएसएमटी ही हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत आहे. रविवारी करमाळीहून मुंबईकडे धावताना अचानक चालू गाडीचे इंजिन रेल्वेपासून वेगळे झाले. नशीबाने गाडी रूळांवर थांबली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा इंजिन डब्ब्यांना लावण्यात आले. अचानक झालेला हा प्रकार पाहून प्रवाशांमध्येही थोडा वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सारे प्रवासी मुंबईला सुखरूप परतले आहेत.
#Watch | Karmali-Mumbai special train's engine uncoupled near #Kankavali yesterday. Konkan railway has ordered an inquiry@RailMinIndia @PiyushGoyalOffc @PiyushGoyal pic.twitter.com/JgShVOEugx
— Mumbai Mirror (@MumbaiMirror) January 28, 2019
स्थानिकांनी या प्रकाराचं मोबाईलमध्ये शुटिंग केले आहे. कोकण रेल्वेने धावत्या रेल्वेचं इंजिन डब्ब्यांपासून वेगळं होणं हा प्रकार तांत्रिक कारणामुळे झाल्याचं म्हटलं आहे. मात्र याप्रकरणी कोकण रेल्वे अधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.