पाहा Video : काही मिनिटांतच उध्वस्त झाला शेकडो वर्षापूर्वीचा पुल
कालू नदी पुल (फोटो सौजन्य-यु ट्युब)

मुंबईपासून ठाण्यानजीक कालू नदीवर (Kalu River) बनविला गेलेला शेकडो वर्षांपूर्वीचा हा पुल काही मिनिटांतच उध्वस्त करण्यात आला आहे. या पुलाला बॉम्ब हल्ल्याच्या माध्यमातून उध्वस्त केल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तत्पूर्वी येथील आजूबाजूच्या परिसर खाली करण्यात आला होता.

खरतर, हा पुल मुरबाड (Murbad) आणि शहापुर (Shapur) तालुक्याच्या मधील कालू नदीवर बांधला गेला होता. तर 2016 मध्ये येथून होणारे दळणवळण थांबविले गेले होते. तसेच नदीवर नवीन पुल बांधल्याने तेथील नागरिकांनी जुन्या पुलावरुन जाणे बंद केले होते. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून महाराष्ट्राच्या लोक निर्माण विभागानेसुद्धा माणसांनी येथून जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली होती.

तसेच 2016 मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशांच्या काळातील पुल पावसामुळे वाहून गेला होता. या दुर्घटनेत 20-22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.