Kalicharan Maharaj Offensive Statements: कालीचरण महाराज यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत लेखी दिलगिरी (Kalicharan Maharaj Apologises) व्यक्त केल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. कालीचरण यांनी महिलांना केवळ उपभोगाची वस्तू असल्याचे संबोधले होते. त्यांच्या या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Woman) स्वत:हून दखल घेतली होती. त्यामुळे आयोगाने नाशिक पोलिसांकडून याबाबत नोटीस पाठवून खुलासा करण्याबाबत निर्देश दिले होते.
कालीचरणकडून लेखी दिलगिरी
रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडिया मंच एक्स (पूर्वीचे ट्विटर) द्वारे पोस्ट लिहून दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची,महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्याची घटना समोर आल्यानंतर समाज माध्यमातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.महिलांबाबत अशोभनीय, अवमानजनक वक्तव्य झाल्याने महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली.राज्य महिला आयोगाने नाशिक पोलीसांना नोटीस पाठवून याबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनतर नाशिक पोलीसांकडे कालीचरण महाराज यानी आपल्या वक्तव्याबाबत लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे.सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी महिलांबाबत वक्तव्य करताना काळजी घेतलीच पाहिजे. (हेही वाचा, Kalicharan Maharaj Statement: डुकराचे दात पाण्यात भिजवून मुलीला द्या, कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान)
रुपाली चाकणकर पोस्ट
नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची,महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्याची घटना समोर आल्यानंतर समाज माध्यमातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.महिलांबाबत अशोभनीय, अवमानजनक वक्तव्य झाल्याने… https://t.co/eRvGIngIX0
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 26, 2024
नाशिक पोलिसांना निर्देश
दरम्यान, राज्य महिला आयोगाने आपल्या एक्स हँडलवरुन दिलेल्या माहितीत म्हटले की, कालीचरण महाराज यांनी महिलांबाबत अश्लील भाषेत वक्तव्य केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलीस आयुक्त, नाशिक यांना नियमानुसार चौकशी करून कारवाई करत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा, Kalicharan Maharaj Statement: राजकारणाचे हिंदूकरण करा, हिंदूंची व्होट बँक तयार करा, कालीचरण महाराजांचे वक्तव्य)
दरम्यान, राज्य महिला आयोगाने नाशिक शहर पोलिसांना दिलल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात कालीचरण महाराज यांनी सुखाची व्याख्या समजून सांगताना महिलांबाबत अश्लील भाषेत लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याबाबतची घटना प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशल्यामुळे समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. तरी प्रकरणाची योग्य ती नियमानुसार चौकशी करण्यास संबंधित पोलीस स्टेशन यांना योग्य ते आदेश व्हावेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा.