पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारले: शरद पवार
Sharad Pawar | Sharad Pawar | (Photo Credit-Facebook)

झारखंड विधासभा निवडणूक निकाल 2019 (Jharkhand Assembly Election Results 2019) चे कल हाती येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणास झारखंडच्या जनतेने नाकारले असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालांचे कल पाहता झारखंडमध्ये काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जोरदार टक्कर देत असून आघाडी घेताना दिसत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. केंद्र सरकारच्या अनेक धोरणांविरुद्ध झारखंडची जनता निकाल देताना दिसत आहे. अनेक आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष भरकटवण्यासाठी केंद्र सरकार विविध मुद्दे उकरुन काढत आहे. एनआरसीचा मुद्दाही त्यातलाच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. (हेही वाचा, शरद पवार यांच्यासाठी खूशखबर! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झारखंडमध्ये गजर; कमलेश कुमार सिंह यांच्या रुपात घड्याळ योग्य वेळ साधण्याची शक्यता)

एनआरसी हा देशात तुफळी माजवणारा कायदा आहे, असा आरोप करत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. दरम्यान, एनआरसीला विरोध करणाऱ्या लोकांच्या भावना समजण्यासारख्या आहेत. परंतू, त्याविरोधात आंदोलन करताना नागरिकांनी शांततेचा मार्ग अवलंबून आपला विरोध करावा. सर्व आंदोलने गांधींच्या मार्गाने करावीत, असे अवाहनही शरद पवार यांनी या वेळी केले.