Jayant Patil Removed Face Mask: 'जगात करोना नाही, असं मला वाटतंय', जयंत पाटील यांनी भरसभेत काढला तोंडावरचा मास्क; मीडियालाह सुनावले
Jayant Patil | (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तरीही राज्यातील नागरिकांना गांभीर्य राहिलेले दिसत नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी, गर्दीतून फिरताना मास्क न लावणे, निष्काळजीपणा करताना लोक दिसतात. नागरिकांच्या या वर्तनावरुन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी एका भर कार्यक्रमात उपस्थितांना उपरोधीक टोला लगावला आणि स्वत:च्या तोंडावरचा मास्कही काढून टाकला. ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly By-Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. ,"तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही, असं मला वाटतंय म्हणून मी पण मास्क काढून बोलतो" असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरस संसर्ग वाढतो आहे. त्यात राज्य सरकार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील कोरोना नियमांचे पालन करा. गर्दी टाळा, मास्क वापरा असे अवाहन करत आहेत. असे असतान जयंत पाटील यांनी ,"तुमचे सर्वांचे चेहरे पाहून जगात करोना नाही, असं मला वाटतंय म्हणून मी पण मास्क काढून बोलतो" असे म्हटल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काही लोक बुचकाळ्यात पडले आहेत. तर प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरुन प्रसारमाध्यमांनी स्वत: पाटील यांनाच विचारले. यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी आपण हे विधान उपरोधात्मक केले आहे. माझ्या बोलण्यातील उपरोध जर आपल्या लक्षात येत नसेल तर ते माझे दुर्दैव आहे. असे म्हणत 'यूज द सेन्स' असे म्हणत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही जोरदार संताप व्यक्त केला.

जयंत पाटील यांनी ज्या सोलापूर जिल्ह्यात हे वक्तव्य केले त्याच सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांना बेड्सही अपूरे पडत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी स्थिती असताना राज्य सरकारमधील एका महत्त्वाच्या मंत्र्याने करावे याबाबत आश्यर्च व्यक्त केले जात आहे.