Jalgaon | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: जळगाव जिल्ह्यात अमळनेर ,एरंडोल (Erandol), चाळीसगाव (Chalisgaon), चोपडा (Chopda), जळगाव ग्रामीण (Jalgaon Rural), जळगाव शहर (Jalgaon), जामनेर (Jamner), पाचोरा (Pachora), भुसावळ (Bhusawal), मुक्ताईनगर (Muktainagar), रावेर (Raver) हे विधानसभा मतदारसंघ येतात. एकनाथ खडसे, गिरीश महाजन, यांसह आनिल गोटे या नेत्यांमुळे अलिकडे हा जिल्हा राजकीयदृष्ट्या चर्चेत असतो. विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमिवर या मतदारसंघातील राजकीय स्थिती, इतिहास आणि सध्यास्थिती पाहूया थोडक्यात

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे गुलाबराव देवकर हे या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात दोन तालुक्यांतील गावाचा समावेश होतो. त्यामुळे इथून प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधिला दोन्ही तालुक्यांशी जमवून घ्यावे लागते. या मतदारसंघात प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळतो. या मतदारसंघात ग्रामपंचायत, पंचायत सिमिती आणि जिल्हा परिषद अशा विविध संस्थांमध्ये शिवसेना भाजपची पकड पाहायला मिळते.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल

गुलाब पाटील – शिवसेना – 84020

गुलाबराव देवकर – राष्ट्रवादी -52653

एरंडोल विधानसभा मतदारसंघ

एरंडोल विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, कालांतराने हा मतदारसंग जनता दल, शिवसेनामार्गे हा मतदारसंघ युतीच्या छायेत आला. मात्र 2014 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आला. आता या वेळी या मतदारसंघात जोरदार संघर्ष पाहायल मिळतो.

एरंडोल विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल

डॉ.सतिष पाटील – राष्ट्रवादी कॉंग्रेस – 55,656

चिमणराव पाटील – शिवसेना – 53,673

मच्छिंद्र पाटील – भाजप – 28,901

चोपडा विधानसभा मतदारसंघ

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला चोपडा विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. यावल आणि चोपडा अशा दोन तालुक्यातील भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे.

२०१४ विधानसभा निवडणुक निकाल

चंद्रकांत सोनवणे – शिवसेना – ५४,१७६

माधुरी पाटील – राष्ट्रवादी – ४२,२४१

जगदीश वळवी – भाजप – ३०,५५९

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ

जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जाते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवार उन्मेष पाटील विजयी झाले होते. आता या वेळी कोणालासंधी मिळते याबाबत उत्सुकता आहे.

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2014 निकाल

उन्मेष पाटील – भाजप – ९४,१५९

राजीव देशमुख – राष्ट्रवादी – ७१,३६४

रमेश गुंजाळ – अपक्ष – २५,६१०

या वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.