Enforcement Directorate | (Photo Credit: Twitter/ANI)

जळगावचे माजी आमदार मनीष जैन (Manish Jain)  आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain)  यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदभार्त मनीष जैन आणि ईश्वर जैन यांची मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकाने चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध या शहरात आता याच गोष्टीची चर्चा ही सुरु झाली आहे.  या चौकशीमुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.   (हेही वाचा - Jambo Covid Center Scam: मुंबईतील EOW ने सुजित पाटकरला घेतले ताब्यात, जंबो कोविड सेंटर घोटळ्या प्रकरणी मिळाली 'ही' माहिती)

मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली आहे. ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फार्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. या कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी आहेत. दरम्यान ईडीची ही शहरातील पहिलीच कारवाई असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.