Anil Deshmukh | Photo Credits: Facebook

Kangana Ranaut Y+ Security Controversy: कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला असून दरम्यान विरोधकांनी टिका करायला सुरुवात केली असून आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एक वेगळंच युद्ध सुरु झाले आहे. कंगना 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असून तिच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'Y' दर्जाची सुरक्षा (Y Level Security) देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या व्यक्तीला 'Y' दर्जाची सुरक्षा दिली जाणं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे' असे सांगत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केंद्रावर टिका केली आहे.

त्याचबरोबर 'महाराष्ट्र हा केवळ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून भाजप आणि जनतेचा पण आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान करणा-या लोकांचा सर्व पक्षांनी निषेध केला पाहिजे' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. कंगना रनौत हिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाची BMC अधिका-यांनी केली पाहणी, अभिनेत्री ने ट्विट मधून केला 'हा' गंभीर दावा

थोडक्यात आता कंगना रनौत हे प्रकरण आता वेगवेगळी वळणं घेऊ लागला आहे. यामुळे राजकीय वातावरण कितपत गढूळ होणार हे येणा-या काही दिवसांत कळेलच. दरम्यान आज अचानक मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी कंगनाच्या मुंबईतील पाली येथील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला. कंगनाने याबाबत संताप व्यक्त केला असून आपले स्वप्न लवकरच तुटणार आहे असे सांगत गंभीर दावा केला आहे. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.