Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) भागात असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र धुराचे लोळ परसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसंच या आगीत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

दादर हे अत्यंत मोक्याचे असून येथे दुकानांची रांगच रांग आहे. तसंच या भागात लोकांची चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे हानी होण्याची शक्यता अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (मुंबई: लोअर परळ येथील इस्राइली दूतावास असलेल्या Marathon Futurex इमारतीला आग)

ANI ट्विट:

गेल्या दोन दिवसातील आग लागण्याची मुंबईतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजी मुंबईतील माझगाव येथील GST भवनाला आग लागली होती. यावेळी अग्निशामन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर 19 फेब्रुवारीला लोअर परळ येथील मॅरेथॉन फ्यूचेरेक्स या इमारतीला आग लागल्याचे वृत्त हाती आले होते. या आगीतही कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते.