आज (15 मे) जागतिक कुटंब दिन. आपलं कुटुंब हे आपलं विश्व असतं. कुटुंबासाठी आपण मेहनत घेत असतो. तर कुटुंबाची सुरक्षितता ही प्राधान्यक्रमावर असते. कोरोना व्हायरच्या वाढत्या विस्तारामुळे सध्याचा काळ कठीण असून सुरक्षित राहण्याची नितांत आवश्यकता आहे. याचीच आठवण महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा करुन दिली आहे. जागितक कुटुंब दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारने कोविड 19 पासून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करा असे आवाहन नागरिकांना केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी 'घरी रहा, सुरक्षित रहा' असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येते. (महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक)
आज जागितक कुटुंब दिनानिमित्त कोविड 19 पासून आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्धार करा, असे महाराष्ट्र शासनाने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. "कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन नाही, चला या जागतिक कुटुंबदिनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेईन COVID 19 पासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करूया!" अशा आशयाचे हे ट्विट आहे.
MAHARASHTRA DGIPR Tweet:
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन नाही, चला या जागतिक कुटुंबदिनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेईन #COVID_19 पासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करूया!#WarAgainstVirus #WorldFamilyDay #internationaldayoffamilies pic.twitter.com/Es8BLxWOoL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 15, 2020
भारतात कोरोनाचा विळखा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 81970 पर्यंत पोहचली आहे. तर 24 तासांत 3967 नव्या रुग्णांची भर पडली असून 100 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत प्रथमस्थानी असलेल्या महाराष्ट्रात 27524 कोरोना बाधित आहेत. त्यातून 6059 रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तर 20446 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे या शहारांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन अटळ असून त्याचे स्वरुप आणि कालावधी लवकरच सरकारकडून स्पष्ट करण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांना संबोधित करताना सांगितले आहे.