राज्य विधिमंडळा च्या विशेष अधिवेशनात एससी एसटी आरक्षणावर झाला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

राज्य विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. हे एकदिवसीय अधिवेशन 20 मिनिटांत संपले. या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे संसदेत SC-ST आरक्षण मुदतवाढीचं विधेयक आधीच संमत झाले. आता विधीमंडळातील या अधिवेशनात आरक्षण मुदतवाढीच्या विधेयकाच्या पाठिंब्याचा ठराव करण्यात आला. 20 मिनिटांच्या अधिवेशनात झालेला हा निर्णय खूपच महत्त्वाचा असल्याचा सांगण्यात येत आहे. भारतीय संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 संसदेत संमत झालं. त्यानंतर आता राज्यांकडून या विधेयकाला पाठिंबा देणारे ठराव केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्याही विधीमंडळाने या विधेयकाला पाठिंब्याचा ठराव संमत केला. यासाठी विधीमंडळाचं 20 मिनिटांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्याने राज्यपालांचं अभिभाषणही झालं. दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात आलं. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019 च्या समर्थनाचा ठराव असं एकूण कामकाज विधीमंडळात झालं.

ANI चे ट्विट:

आपल्या अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी पुढे जाईल आणि काम करेल असं सांगितलं. तसेच सर्व घटकांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध राहिल, असंही नमूद केलं.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संविधान सभेतील चर्चांचा संदर्भ देऊन आरक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणावरील मताचाही उल्लेख केला.