Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यांत वादळी वा-यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या ट्विटनुसार, येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने 10 ते 24 मे दरम्यान महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासाठी येत्या 5 दिवसांसाठी डगडाटासह मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मोठ्या झाडांच्या जवळ वा आडोशाला उभे राहू नका असेही सांगण्यात आले आहे. वीज चमकत असताना उघड्या ठिकाणी उभे राहू नका असाही सल्ला देण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Update: राज्यात दुपारी ऊनाचा कडाका तर संध्याकाळी पावसाचा तडाखा; 10 मे पर्यंत चालणार ऊन-पावसाचा खेळ

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले असून यात पिकांचे, फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतक-यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर कर्जत-जामखेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.