BMC (File Image)

Marathi Board: मराठी नामफलक दुकानाबाहेर लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका(Mumbai Municipal Corporation) आता सक्तीची पावले उचलताना दिसत आहे. सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. दुकानाबाहेर मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत वेळोवेळी सांगूनही न ऐकलेल्या दुकानदारांना आता चांगलीच अद्दल घडणार आहे. दुकाने, आस्थापनांबाहेर मराठी भाषेत, देवनागरी लिपित नामफलक न लावणाऱ्यांना १ मे २०२४ पासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार, असे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Fine) दिले आहेत. याशिवाय मराठी भाषेत फलक नसलेल्यांचा परवाना तत्काळ रद्द होणार आहे. त्यामुळे त्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. (हेही वाचा :मराठी पाटी न लावल्याने ठाण्यात MG Motors च्या शोरूमला मनसे कडून लावण्यात आलं काळं! )

मराठी पाटी न लावल्यास सक्त कारवाईचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आतापर्यंत ३,०४० दुकाने आणि आस्थापनांना मराठी नामफलक न लावल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तर, त्यातील १७७ प्रकरणांमध्ये न्यायालयाने १३ लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांबाहेर मराठी भाषेत, देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणंबंधनकारक आहे. असं असूनही काही जण मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करतात. त्यांना आता १ मे २०२४ पासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे. त्याशिवाय, त्यांच्या आस्थापनांचा परवाना देखील रद्द होणार आहे. त्यामुळे नव्याने परवाना मिळविणे, फलक तयार करणे या बाबी लक्षात (Mumbai Municipal Corporation) घेता, संबंधित आस्थापनाधारकांना किमान २५ हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्चाचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व दुकाने आणि आस्थापनांबाहेर मराठी फलक लागणार हे नक्की.