नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका दुकानातून गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती. या वासाने आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दुकान उघडले होते. दुकानाच्या आतून केवळ मानवी अवशेषच सापडले नाहीत, तर तिथल्या एका प्लास्टिकच्या पेटीत डोळे आणि कानही दिसत असल्याचे पाहून पोलीस पथक आश्चर्यचकित झाले. वास्तविक, ही घटना नाशिक येथील मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरातील आहे. येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर एका बंद दुकानातून डोळे, कान आणि चेहऱ्याच्या इतर भागांसह अनेक मानवी अवशेष सापडले आहेत, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. याला दुजोरा देताना पोलिसांनी सोमवारी सांगितले की, हे मानवी अवशेष इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात प्लास्टिकच्या दोन डब्यात ठेवण्यात आले होते.
अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून दुकानातून दुर्गंधी आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसांना याची माहिती दिली. कान, मेंदू आणि चेहऱ्याचे काही भाग यांसह इतर मानवी अवशेष सापडले. (हे देखील वाचा: Vasai: मौलवीकडून 10 वर्षीय मुलीचे स्मशनात चुंबन; लोकांकडून बेदम चोप)
अधिका-याने असेही सांगितले की फॉरेन्सिक टीमने पुढील तपासासाठी मानवी अवशेष ताब्यात घेतले आहेत. दुसरीकडे, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले की, दुकान मालकाची दोन्ही मुले व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यामुळे हे मानवी अवशेष वैद्यकीय कारणासाठी ठेवण्यात आले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या तपास सुरू करण्यात आला आहे.