Instagram Copyright Phishing Scam: 'इन्स्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅम'पासून कसे सावध राहायचे? गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून महत्वाचा व्हिडिओ पोस्ट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचबरोबर फेसबूक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच इंस्टाग्रामवर काही समाज कंटक कॉपीराईट फिशिंग स्कॅमचे (Copyright Phishing Scam) जाळे पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत. वापरकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक केली जात आहे. मागील काही दिवसांपासून अशा फसवेगिरीच्या घटनांमध्ये वाढही झाल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी नागरिकांसाठी महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात कशाप्रकारे नागरिकांची फसवणूक केली जाते, यासंदर्भात योग्य माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने 'इन्स्टाग्राम कॉपीराईट फिशिंग स्कॅम' संदर्भात नागरिकांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी हा संपूर्ण व्हिडीओ पाहावा व अशा प्रकारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावे, असे मी आवाहन अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व जनतेला केले आहेत. हे देखील वाचा-Dhule: फेसबुक लाईव्ह करून धुळ्यातील युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; आयर्लंडचे फेसबुक अधिकारी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण

अनिल देशमुख यांचे ट्विट-

महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. याआधी पुण्यात तरूणींच्या नावाने बनावट फेसबूक अकांऊट तयार करून तरूणांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती.