Hovering of Drones In Beed: बीड जिल्ह्यातील (Beed District) शिरूर कासार (Shirur Kasar) तालुक्यातील विविध गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन (Drones) द्वारे पाहणी करून चोर रात्री चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहेत. ड्रोनद्वारे हेरगिरी (Spying By Drones) करून चोरटे दरोडा टाकून नागरिकांना मारहाण करत आहेत. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावातील नागरिकांनी हेरगिरी करणाऱ्या ड्रोनचे व्हिडिओज आणि फोटोज आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहेत. रात्रीच्या वेळी घरांवर ड्रोन फिरत असून नागरिक या घटनांमुळे संतप्त झाले आहेत. भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सचिन जायभाये यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून शेअर केला आहे. (हेही वाचा - Pune Engineer Stealing Video: पुण्यात महिला इंजिनिअरने फोनिक्स मॉलमधून चोरले सोन्याचे ब्रेसलेट; आरोपी महिलेला अटक, पहा व्हिडिओ)
बीड जिल्ह्यात ड्रोनद्वारे हेरगिरी करून चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पहा व्हिडिओ -
पालकमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना द्याव्यात. गावागावात अधिकचे पोलिस व्हॅन देऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही विनंती.
@Dev_Fadnavis @dhananjay_munde pic.twitter.com/cdGGwCc6Yn
— Sachin Rambhau Jaybhaye (Modi Ka Parivar) (@sachinrjaybhaye) August 23, 2024
सचिन जायभाये यांनी आपल्या पोस्टमध्ये ड्रोनद्वारे हेरगिरी करून घडत असलेल्या चोरीच्या घटनांवर प्रकाश टाकला आहे. तसेच त्यांनी या घटनांना आळा घालण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतः लक्ष घालून बीडचे पालकमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना द्याव्यात आणि गावागावात अतिरिक्त पोलिस व्हॅन देऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन केलं आहे.