
Mumbai: मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल्समध्ये (Five-star Hotel) अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई-वडिलांसोबत नाश्ता करण्यासाठी आलेल्या 7 वर्षांच्या मुलीवर गरमागरम चहा टाकल्याप्रकरणी पंचतारांकित हॉटेलच्या वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता गुडगाव येथील निशांत जैन (50) पत्नी आणि दोन मुलींसोबत जे.डब्ल्यू येथील एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी आले होते. मॅरियट हॉटेलमध्ये त्यांनी 24 सप्टेंबर रोजी एक खोली बुक केली होती. मोनालिसा बासुमती नावाची वेटर गरम चहाची किटली घेऊन जात असताना चुकून मायराला धडकली. ज्यामुळे चहा मुलीच्या डाव्या हातावर सांडला. परिणामी मुलगी भाजली. वेदनेमुळे मायरा जोरजोरात रडू लागल्याने बसुमतीने तिला शांत राहण्यास सांगितले.
या घटनेनंतर लगेचच जैन यांनी मुलीला रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. नंतर जैन कुटुंब मायरा यांच्या आजोबांकडे राहण्यासाठी ठाण्याला रवाना झाले. त्यानंतर आजोबा विलासचंद्र पोरवार (72) यांनी शुक्रवारी सहार पोलीस ठाण्यात वेटरविरुद्ध गुन्हा दाखल केला. (हेही वाचा - Mumbai Accident: लालबाग परळ उड्डाणपुलावर भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू; तपास सुरू)
पोरवार यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, वेटरने मायराला तिच्यावर चहा टाकल्यानंतर फटकारले. आम्ही गुन्हा दाखल करताना हॉटेलच्या व्यवस्थापकाचे नाव समाविष्ट करण्यासाठी पोलिसांना वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी ते मान्य केले नाही. माझ्या माहितीनुसार, सहार पोलिस आणि जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या व्यवस्थापनाचे जवळचे नाते आहे.
दरम्यान, भारतीय दंड संहितेच्या कलम 337 (जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे) अंतर्गत शुक्रवारी वेटर बसुमतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.