मुंबई पोलिसांचा आज स्थापना दिवस आहे. या निमित्ताने मुंबई पोलिसांना समुद्र किनाऱ्यावर सहजपणे गस्त घालण्यासाठी 'स्वसंतुलीत विद्युत स्कुटर्स भेट देण्यात आली आहे. या सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर (Segway Electric Scooters) म्हणजेच सेगवे प्रणालीचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या उद्घाटनाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस अधिकारी आणि अंमलदार सुद्धा उपस्थित होते. या इलेक्ट्रिक स्कुटर्समुळे पोलिसांना अधिक मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी मदतगार ठरेल अशा 'स्वसंतुलीत विद्युत स्कुटर्स' (सेगवे) प्रणालीचे माझ्याहस्ते उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी मी स्वतः ही स्कुटर चालवून तिच्या कार्यक्षमतेची पाहणी केली. यावेळी माझ्यासह पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार जी, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या सेगवे प्रणालीमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान होऊन आणखी जोमाने लोकाभिमुख कार्य करतील, याचा मला विश्वास आहे, अशा आशयाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. हे देखील वाचा- Mumbai Local Mega Block on 3 January Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर जंम्बो ब्लॉक नसल्याने दिलासा
ट्विट-
यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्येही मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे सेगवेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी 50 सेगवेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यातील 10 सेगवे वरळीसाठी, 5 नरिमन पॉईंट परिसरासाठी तर वांद्रे, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेगवे देण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले होते.