
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. यातच महाराष्ट्राचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईला एका बुस्टर डोसची गरज असून धारावी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून हा बुस्टर डोस देता येईल, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. धारावीबद्दल सामान्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली असल्याने आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भातील आदेश देण्याची विनंती करणारे पत्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईच्या धारावी परिसरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे. करोनामुळे जी स्थित्यंतरे पहावयास मिळाली आहेत त्यातील प्रमुख स्थित्यंतर ही झोपडपट्टीबहुल भागात दिसून आले. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे येथील उपचार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडलेली दिसली. परिणामी, सर्वसामान्यांमध्ये धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, असे आव्हाड यांनी पत्रात नमूद केले आहे. हे देखील वाचा- लोककलावंत छगनराव चौगुले यांचे योगदान सदैव स्मरणात राहील- उपमुख्यमंत्री अजित पवार
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट-
धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
आर्थीक उलाढाली ला सुरवात होईल
व्हेंटिलेटरवर असलेला बांधकाम उद्योग ला जीवन दान मिळेल.
मुंबई ला एका बुस्टर डोस ची गरज आहे तो #धारावी_पुनर्विकास असेल.
ह्या बाबत @OfficeofUT ह्यांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/bNqzj9gc4M
— Office of Dr. Jitendra Awhad (@AwhadOffice) May 21, 2020
मुंबईत आतापर्यंत 24 हजार 118 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 हजार 702 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये चितांजनक वातावरण निर्माण झाले आहे.