Holi 2024 : लोकल ट्रेन-बसवर रंगांचे फुगे, पिचकारी मारणाऱ्यांनो आवरा स्वत:ला; प्रशासन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत
Photo Credit - Twitter

Holi 2024 : राज्यात नव्हे, तर देशभरात होळीनिमित्त बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आलं आहे. मुंबईत ( Mumbai Holi) अनेक ठिकाणी सेलिब्रिटी होळी (Holi) खेळली जात आहे. ज्यात मोठ-मोठे स्टार हजेरी लावतात. मात्र, या सगळ्यात काही ठिकाणी नागरिकांना अप्रिय प्रसंगांना सामोर जाव लागतं. होळीला सर्वांना सुट्टी असेल असं नसतं, काहींना कामावरही जावं लागतं. मात्र, काही अतिउत्साहींमुळे कामावर जाणाऱ्या अनेकांच्या कपड्यांवर रंगांचे डाग लागतात. काहींचे चेहरे खराब होतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. होळी सारख्या सुंदर सणाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मध्य रेल्वे (Centarl Railway)आणि बेस्ट (Best Bus) प्रशासनासह पोलीस यंत्रणांनी कारवाई तंत्र वापरणार असल्याचं सांगितलं आहे. (हेही वाचा : Like the Festival of Colours ‘Holi’: होळी सारखे साजरे केले जाणारे सण? जाणून घ्या या अनोख्या सणांविषयी )

होळीसह रंगपंचमीच्या दिवशी लोकल ट्रेन, बसवर रंग किंवा पाण्यानं भरलेले फुगे, पिचकारी मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते प्रवाशांना लागून इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळं अशी कृत्य न करण्याची ताकिद अतिउत्साहींना देण्यात आली आहे. त्याशिवाय, फक्त रेल्वेच नव्हे, तर मुंबईतील बेस्ट बसवरही रंगाचे फुगे मारल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात येईल. (हेही वाचा : Holi Date 2024: होलिका दहन, धुलीवंदन आणि रंगपंचमीची तारीख आणि तिथी, जाणून घ्या )

रंगपंचमीपूर्वी दोन - तीन दिवस आधीपासूनच अशा घटना घडण्यास सुरुवात होते. झोपडपट्टी किंवा दाटीवाटी असणाऱ्या वस्तीत अशा घटना घडतात, ज्यामुळं प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याच्याही घटना समोर येतात. त्यामुळं असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी आता रेल्वे प्रशासन कायद्याचीच मदत घेताना दिसत आहे.