Marine Drive in Mumbai (Photo Credit: IANS/File Photo)

मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने आज पहाटेपासून विश्रांती घेतली असली तरीही पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहेत. त्यामुळे मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून गरज असल्यास घराबाहेर पडण्याची सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच आज दुपारी 3.05 मिनिटांनी मुंबईतील समुद्रात मोठी भरती (High Tide)  येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारी 3.05 च्या सुमारास समुद्रात 4.62 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.

या हाय टाइडच्या वेळेस नागरिकांनी किंवा मासेमारांनी समुद्राच्या जवळ जाणे टाळावे तसेच शक्य तितक्या सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी येथे पाहा-

मागील दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे मुंबईत रस्ते आणि रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी मुंबईमध्ये 204 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला. हा ऑगस्टमधील गेल्या 10 वर्षांतील 24 तासांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली आहे. केवळ मान्सूनचा निम्मा ऋतूमध्येच मुंबई उपनगरांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यंदा मुंबईमध्ये सरासरीपेक्षा 24% अधिक पाऊस पडला आहे.

हेही वाचा- Mumbai Railway Update: मुंबईची 'लाईफलाईन' हळूहळू पूर्वपदावर, मात्र कर्जत-कल्याणसह या मार्गांवरील लोकलसेवा पूर्ववत होण्यास मंगळवार उजाडण्याची शक्यता

मुंबईमध्ये यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली मात्र काही ठराविक दिवस पावसाने दमदार बॅटींग केल्याने सध्या मुंबईमध्ये पाणीसाठा मुबलक आहे. मुंबईप्रमाणेच नाशिक,कोकण भागामध्ये पाऊस कोसळत आहे.