Beed Rains (Photo Credits: Twitter/ANI)

Marathwada Rains Update: मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरीही सोमवारी (23 सप्टेंबर) मराठवाड्याला झोडपून काढलं आहे. काल संध्याकाळपासून झालेल्या दमदार पावसामुळे बीड, परभणी, हिंगोली या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील 24 तासांमध्ये बीडमध्ये सुमारे 140 mm पाऊस झाल्याची नोंद आहे. तर एकूण 550 mm पाऊस कोसळला आहे. यंदाच्या पावसाळ्याच्या दिवसातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. बीडच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात देखील कालच्या पावसामुळे 3 फूटाहून अधिक पाणी साचल्याचं चित्र होतं.

रविवार पासून परभणीमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. या परतीच्या पावसाने मराठवाड्यातील काही भागांना सुखावः धक्का दिला असला तरीही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.बीड शहरातून वाहणार्‍या बिंदुसारा नदीला देखील पहिल्यांदा इतक्या प्रमाणात आलेले पाणी गावकर्‍यांनी दगडी पुलावरून वाहताना पाहिले. बीड, परभणी सोबत हिंगोली शहरामध्येही पावसांच्या दमदार सरी पहायला मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी निम्म्या मराठवाड्याची तहान भागवणार्‍या जायकवाडी धरण पूर्ण भरल्याने त्याचे दरवाजे उघडे करण्यात आले आहेत.

ANI Tweet  

आज सकाळी पुण्यात कात्रज, कोंढवा परिसरात तर कोल्हापूर शहर व उपनगरांमध्येही पुन्हा दमदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे.