Photo Credit- X

Mumbai Rains: कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे(Signal Failure near Kalyan Station) मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याणजवळ लोकल थांबवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि कर्जत कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. मुंबईत पुढील 3-4 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फटका नोकरदार वर्गाला बसत आहे. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.(हेही वाचा:Mumbai Rain Alert: मुंबईत येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीरा )

वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी सतर्कता म्हणून एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय तीन टीम मुंबईत आणि एक टीम नागपूर येथे तैनात करण्यात आली आहे. (हेही वाचा: Mumbai Tide Forecast: मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, जाणून घ्या ओहोटीची वेळ; पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना)

नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी करण्यात आलेली आहे. तर सकाळच्या शाळांना जिथे पाणी भरते, तिथे अकरा वाजता विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत. दुपारी भरती असल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याची अडचण होऊ नये, म्हणून सुट्टी जाहीर केल्याची माहिती मिळतेय.

मुंबईत पुढील 3-4 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. नवी मुंबईतील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलीय. सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता, मात्र आता पावसाचा जोर वाढला (Navi Mumbai Municipal Corporation) आहे. नवी मुंबईत सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी सचण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.