महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या राज्यातील दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. सीबीआयच्या गुन्ह्यावरुन ईडीनं (ED) दाखल केलेल्या गुन्ह्यात हायकोर्टान देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. ईडीच्या कारवाईतून देशमुखांना जामीन (Bail) मंजूर झाला असला तरी सीबीआयची टांगती तलवार अजूनही अनिल देशमुखांवर आहे. म्हणूनचं अनिल देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. तरी अनिल देशमुखांच्या या याचिकेवर आजपासून सुणावणीला सुरुवात होणार आहे. तरी या सुणावनी नंतर अनिल देशमुखांना दिलासा मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. गेले अकरा महिन्यापासून अनिल देशमुख मनी लॉंड्रीग (Money Laundering) प्रकरणात अटकेत आहेत.

 

तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray)  पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Scam Case) ईडीची कारवाई सुरु आहे. संजय राऊत यांना चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये असुन संजय राऊतांसाठी आजची सुणावनी महत्वपूर्ण सुनावणी असल्याचं संजय राऊत यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं आहे. (हे ही वाचा:- Sushma Andhare: राज ठाकरेंचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट, शिवसेना नेत्या सुष्मा अंधारेंचा भाजपसह मनसेला खोचक टोला)

 

राष्ट्रावादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते संजय राऊत (sanjay Raut) हे दोन्ही नेते या पक्षासाठी अत्यंत महत्वाचे नेते आहे. त्यामुळे आज जामीन प्रकरणी काय सुनावणी होणार याकडे राष्ट्रवादीसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं लक्ष लागलं आहे. आज या दोन्ही नेत्यांचा जामीन मंजूर व्हावा अशी आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.