देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा (Navneet Rana) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी राणा दाम्पत्यास दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना नेमक्या कोणत्या अटी व शर्थींवर जामीन मिळाला आहे हे समजू शकले नाही. हनुमान चालिसा पटन (Hanuman Chalisa Row) प्रकरणात त्यांना अटक झाली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा आमदार आणि खासदार असलेल्या या दाम्पत्याने केली होती. त्यासाठी ते हट्टालाच पेटले होते. त्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते. परिणामी मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या दाम्पत्यास स्थानबद्धतेची नोटीस दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या वेळी या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरुनही गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा, Matoshree Hanuman Chalisa Row: MP Navneet Rana यांची Spondylosis Treatment साठी कारागृहातून जेजे रूग्णालयात रवानगीलर )
[Hanuman Chalisa Row]
Special Court verdict on bail application of independent MP #NavneetRana and MLA Ravi Rana in sedition FIR over chanting of #HanumanChalisa outside Chief Minister of Maharashtra, Uddhav Thackarey's home.
Order expected shortly. pic.twitter.com/ZNO1wqZuZk
— Live Law (@LiveLawIndia) May 4, 2022
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्पॉन्डिलेसिस आजारामुळे त्रस्त झाल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाचा निकाल आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.