Gun Shot | Photo Credit - Pixabay

नवी मुंबई मध्ये बेलापूर येथे बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे (Naveen Chichkar)  वडील गुरु चिचकर (Guru Chichkar Suicide) यांनी आज (25 एप्रिल) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गुरू चिंचकर यांनी डोक्यात गोळ्या झाडून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, गुरू चिंचकर यांची सुसाईड नोट सापडली असून त्यांनी मुलावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेस दाखल झाल्या असल्याने अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे. आत्महत्या करण्यासाठी 9 M M गोळीच्या पिस्तूलाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबई मध्ये एक ड्रग्स रॅकेट उघड झाले. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त आले. या मध्ये गुरू चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा समावेश आहे. एका मुलाला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा मुलगा फरार आहे. नक्की वाचा:  Mumbai: मुंबईत एनसीबीकडून केलेल्या कारवाईत 11.54 किलो कोकेन आणि 4.9 किलो ड्रग्स जप्त, 4 जणांना केली अटक.  

पोलिस चौकशीच्या विवंचनेमधून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहलं आहे. आपल्याला सारखं पोलीस ठाण्यात बोलावले जातं. दरम्यान त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहले आहे. याप्रकरणी नेरुळ येथील NRI पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.