Mumbai Crime: एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना जीआरपीकडून अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एक्स्प्रेस ट्रेनमधून (Express train) प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या दोन महिलांना कल्याण गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी (GRP) अटक केली आहे. जीआरपीने सांगितले की त्यांनी या दोघांकडून सात प्रकरणांमध्ये 4.27 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. रेखा कांबळे आणि रोजा कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.15 च्या सुमारास जीआरपीने त्यांना एका चोरी प्रकरणात अटक (Arrest) केली.  उल्हासनगर (Ulhasnagar) येथील तक्रारदार संगिता डोमाडे या कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 4 वरून तपोवन एक्स्प्रेसमध्ये चढत असताना दोन महिलांनी त्यांच्या पर्सची झिप उघडून दागिने चोरून नेले. हेही वाचा Farmers Suicide: कर्जमाफी होऊनही एकट्या मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यांत 805 शेतकऱ्यांची आत्महत्या

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून जात असताना, पोलिसांनी दोन महिलांना संशयास्पदरित्या फिरताना पाहिले आणि शेवटी 15 डिसेंबर रोजी त्यांचा चिंचपोकळी येथे शोध घेतला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या सर्व मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. या दोन्ही महिला सातरस्ता येथील रहिवासी असून मूळ कर्नाटकातील आहेत. इतर सहा चोरींमध्ये चोरलेल्या काही मौल्यवान वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.