मुंबई उपनगरीय सेवा ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

मुंबईच्या उपनगरीय लोकलचा मेकओव्हरला हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाली आहे. तसेच या प्रकरणी रेल्वे विकास महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

पीयूष गोयल यांचा मुंबई शहरी परिवहन प्रकल्प 'एमयूटीपी-3 ए' (MUTP-A) हा 55 कोटींचा विशेष प्रकल्प आहे. तसेच कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी राज्य सरकारची मंजुरी असणे आवश्यक असते. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. त्यामुळे या प्रकल्पाला 1 कोटी रुपयांची तरतूद मिळाली असून लवकरच याबाबतचे काम सुरु होणार आहे.

या मुंबई लोकलच्या मेकओव्हरचे काम डिसेंबर किंवा जानेवारी 2019 मध्ये चालू होणार आहे. तसेच 'एमयूटीपी-3 ए'साठीच्या कामाची निविदा तयार करण्यात आली आहे.