महाराष्ट्र जलसंपदा विभागात ज्युनिअर सिव्हिल इंजिनीअर पदासाठी भरती सुरू; 15 ऑगस्ट पर्यंत करू शकाल अर्ज
Representational Image (Photo Credits: File Photo)

Water Resources Department Maharashtra Recruitment: हातामध्ये शिक्षणाची डिग्री असली तरीही त्याच्या योग्यतेची नोकरी मिळणं देखील महत्त्वाचं आहे. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी आणि त्याच्यासोबत येणारे अनेक भत्ते यामुळे अनेकांना त्यांचं आकर्षण असतं. दिवसेंदिवस जीवघेण्या होत चाललेल्या स्पर्धेमध्ये सरकारी नोकरी मिळवणं हे देखील एक आव्हान होत चाललं आहे. मात्र तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी आहे. दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! भारतीय टपाल विभागात 1735 पदांसाठी नोकरभरती

ज्युनिअर इंजिनियर्ससाठी सध्या सरकारी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यामध्ये ज्युनिअर इंजिनीअर्स (सिव्हिल)च्या 500 जागांसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये नोकरीची संधी आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या जागा 'ब' प्रवर्गासाठी असतील 25 जुलैपासून यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पद - ज्युनिअर इंजिनीअर्स (सिव्हिल)

जागा - 500

अधिकृत वेबसाईट: mahapariksha.gov.in

शैक्षणिक पात्रता - स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य डिग्री

वयाची अट: १५ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: 500 रूपये (राखीव प्रवर्ग: 300 रूपये )

महाराष्ट्र भरती2019 च्या आधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज खुले केले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारे 16% मराठ्यांना आणि 10% सवर्णांना आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या मेगा भरतीला वेग आला आहे.