भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक (PMC Bank) खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने खातेधारकांना दिलासा देत बँक खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेत 10 हजारांनी वाढ केली आहे. त्यामुळे पीएमसी बँक खातेदारांना आपल्या बँक खात्यातून थेट 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम एकाच वेळी काढता येणार आहे. या आधी खातेधारकांना केवळ 40 हजार रुपये इतकीच रक्कम ग्राहकांना काढता येत होती.
आरबीआयने पीएमसी बँकेसदर्भात उचललेली पावले पाहता जवळपास 78 बँक ग्राहकांना येत्या काही काळात आपल्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे. आरबीआयने बँक खातेदारांना आणखी एक सूविधा देत म्हटले आहे की, ही रक्कम पीएमसी बँकेच्या एटीएममधूनही काढता येऊ शकते.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवरी आरबीआयला विचारले की, पीएमसी बँक खातेधारकांच्या मदतीसाठी कोणकोणती पावले उचलली गेली आहेत? न्यामूर्ती एससी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आरआय छगला यांच्या खंडपीठाने ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या निर्बंध हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर या विषयावर काय पावले उचलणार याबाबत आरबीआयकडून 19 नोव्हेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा, पीएमसी बँक खाते धारकांना मोठा दिलासा, आरबीआय संलग्न मालमत्ता लिलावासाठी काढणार)
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, आरबीआय हे पूर्ण प्रकरण समजते आणि या विषयांतील ही एक विशेष अभ्यास करणारी संस्था आहे. आम्ही त्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करुन इच्छित नाही. मात्र, आम्ही नक्कीच हे जाणून घेऊ इच्छितो की, खातेधारकांच्या मदतीसाठी आरबीआयने काय पावले उचलली आहेत. अशा आर्थिक प्रकरणांमध्ये आरबीआयच निर्णय घेऊ शकते. कोर्ट नव्हे.