Jewellery (Photo Credits: Pixabay)

यंदाच्या वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी दुसरा म्हणजे अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) दिवस आहे. अक्षय तृतीयेला जसं दान करण्याची मोठी परंपरा आहे तशीच परंपरा या शुभ मुहूर्तावर सोनं (Gold) खरेदीची देखील आहे. सोनं खरेदी करण्यासाठी अनेकजण अक्षय्य तृतीयेचा दिवस राखून ठेवतात. सध्या लग्नसराईचादेखील मोसम असल्याने अनेकांची अक्षय तृतीयेला मोठी सोनं खरेदी होते. काही सोनं वळी, बिस्कीट स्वरूपात विकत घेतात तर काही थेट दागिने घेतात. गुंतवणूकीचा एक पर्याय म्हणून देखील आता सोन्याकडे लोक बघत आहेत. मग यंदाच्या 3 मे दिवशी अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीसाठी बाहेर पडणार असाल तर पहा आजचा सोनं चांदीचा नेमका भाव काय?

आजचा सोन्याचा भाव काय?

आज अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. Goodreturns च्या माहितीनुसार आज भारतामध्ये सर्वसाधारणपणे सोन्याचा दर हा 22 कॅरेट साठी प्रति तोळा (10 ग्रॅम) 47200 रूपये आहे. तर 24 कॅरेट साठी हाच दर 51510 आहे. तर चांदीचा दर हा प्रतिकिलो 62,700 रूपये आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याप्रमाणे चांदीचे दर देखील कमी झाले आहे. Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय? 

दरम्यान भारतामध्ये सोनं चांदी खरेदी करताना त्याचे रिटेल दर, विकायचे दर आणि विकत घेण्याचे दर हे वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येक सराफा दुकानातही दागिन्यांवर घडणावळ दर वेगळे असतात. सोबतच टॅक्स लावले जातात. त्यामुळे ऑनलाईन पाहिलेले दर आणि प्रत्यक्ष खरेदीच्या वेळेस असलेला दर यामध्ये शहरा शहरानुसारही तफावत आढळून येते.

आज एमसीएस्कवर सोन्याचे दर 650 रुपयांनी घसरले आहेत तर असून सराफा बाजारात सोनं यामुळे 990 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मल्टी कमाॅडिटीवर  चांदीचा दर प्रतिकिलो 63,207  रुपये इतका आहे आणि यामध्ये 1142 रुपयांची घसरण झाली आहे.