प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या देशभरात नवारात्रौत्सवाचा सण साजरा केला जात असून अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्याचे दिसनू आले आहे. तसेच सध्या ग्राहक सोने खरेदी करण्यापूर्वी त्याचे भाव किती आहेत त्यानुसार खरेदी करायचे की नाही हे ठरवतात.आजचे सोन्याचे दर चक्क 39 हजारांवर येऊन पोहचले आहेत.

दरवाढीमुळे लोक नव्याने सोने खरेदी करण्यापेक्षा जुन्या सोन्यातच काही फेरबदल करत दागिने घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. सोन्याचे दर आज 24 कॅरेटसाठी 3,845 रुपये असून 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 38,450 रुपये मोजावे लागणार आहेत.तर जाणून घ्या मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे सह अन्य ठिकाणचे सोन्याचे आजचे दर.

>>मुंबईतील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>पुणे येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>नागपूर/नाशिक येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>हैदराबाद येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 36,480 ₹

24 कॅरेट सोने: 39,790 ₹

सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतीमहागाईचा नाही म्हटले तरी सराफाबाजारातील व्यवहारावर परीणाम झालेला पाहायला मिळते.