खुशखबर! गुढीपाडवा (Gudi Padwa) अगदी उद्यावर येऊन ठेपलेला असताना सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणा-यांसाठी ही नक्की आनंदाची बातमी आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे ग्राहकांना या सुवर्णसंधीचा किती लाभ घेता हे सांगता येणार नाही. आज सोन्याचा भाव (Gold Rate) मुंबईत प्रति 10 ग्रॅम मागे 40,766 रुपये इतका आहे. तर चांदीचा कालचा भाग कायम असून प्रति किलो दर 50,800 इतके इतका आहे.
त्याच बरोबर पुण्यात आजचा सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅम मागे 41,655 असून नाशिक मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम मागे 41,621 इतका आहे.
हेदेखील वाचा- BSE Sensex Update: मुंबई शेअर बाजारात हिरव्या निशाण्यावर उघडली सेंसेक्स, निफ्टी; रूपया 76.02 वर
भारतामध्ये कोरोनाचं सावट असताना त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठांसोबतच मुंबई शेअर बाजारावरही झाला आहे. दरम्यान आज (24 मार्च दिवशी) मुंबई शेअर बाजाराच्या प्री- ओपन सेशनमध्ये सकारात्मक स्थिती होती. यावेळेस सेन्सेक्स 4.14% म्हणजे 1074.99 ने वधारला असून 27,057.23 वर होता. आज व्यवहाराची सुरूवात 27,056.23 वर झाली होती. तर या ओपनिंग सेशनमध्ये निफ्टीने 417 अंकांनी उसळी घेत 8,027.25 पर्यंत झेप घेतली होती. तर काल रूपयाचं अवमुल्यन देखील आता सुधारलं आता अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत आज रूपया 18 पैशांनी सुधारला असून तो 76.02 असा सुरुवातीच्या काळात पहायला मिळाला आहे.
ही नक्कीच आनंदाची बातमी असली तरीही लोकांना बंदीमुळे घराबाहेर पडता येत नाहीय. त्यामुळे सोने खरेदी करण्यास जायचे कसा असा मोठा प्रश्न लोकांसमोर उपस्थित झाला आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्यावर आणि सोने खरेदीवर देखील संक्रांत येणार असे म्हणायला हरकत नाही.