Gold | Representational Image | (Photo Credits: IANS)

Gold And Silver Rate Today: दिवाळीचा सण आणि त्याच्या सोबतीला आता सुरू होणारी लगीन सराई यांचं औचित्य साधत अनेकजण सोनं खरेदी करतात. यंदा नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) एकाच दिवशी आल्याने डबल सेलिब्रेशन आहे. दिवाळीच्या धूम धडाक्यात आज (27 ऑक्टोबर) संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी नवा सोन्या-चांदीचा दागिना विकत घेण्याचा विचार करत आहात? मग पहा आजचा मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा दर काय आहे? दिवाळीच्या तोंडावर देशभरात सोन्याचा दर 40,000 च्या जवळ पोहचला आहे. आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rate) अंदाजे 39,740 रूपये इतका आहे. दर सोन्याप्रमाणेच चांदीचा दर देखील यंदा वाढलेला आहे. पण हौसेला काही नसतं. त्यामुळे सराफा दुकानात दिवाळीच्या मुहूर्तावर देखील अनेकांनी सोनं, चांदी खरेदीसाठी गर्दी केलेली पहायला मिळत आहे. Lakshmi Pujan 2019 Date & Shubh Muhurat: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 37 वर्षांनी जुळून आलाय 'हा' योग; जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये सोनं प्रति तोळा कसं?

24 कॅरेट सोनं म्हणजे सगळ्यात शुद्ध सोनं समजलं जातं. मात्र त्याच्यामध्ये दागिने बनवले जाऊ शकत नाहीत. दागिने बनवण्यासाठी 23 किंवा 22 कॅरेट सोन्यामध्ये दागिने बनवले जातात.

24 कॅरेट सोन्याचा दर - 39,740 रूपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोन्याचा दर - 37,850 रूपये प्रति 10 ग्रॅम

सोन्याप्रमाणेच चांदी देखील लाभदायक समजली जाते. यंदा दिवाळीच्या दिवसांत चांदीचे दर देखील चढे पहायला मिळाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचा प्रति किलो दर 48,770 इतका आहे.

दिवाळी हा सण नेत्रदीपक रोषणाईचा, दिव्यांचा आहे. हिंदू धर्मातील सणांचा राजा समजल्या जाणार्‍या दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा या दिवशी सोन्याच्या वस्तू विकत घेण्याची प्रथा आहे. मग यंदा तुम्ही दिवाळी निमित्त काय खरेदी करणारं? हे आम्हांला नक्की सांगा.