Gold Rate On 3rd June: सोन्याचा दर 48 हजारापेक्षा कमी; जाणून घ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील आजचा सोन्याचा दर
Gold & Sliver Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Gold Rates on 3rd June: कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार दिसून येत आहेत. आज सकाळी 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 46703 रुपये इतक होता. तर मंगळवारी हा दर 47075 रुपये प्रती तोळा इतका होता. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 42811 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदी 49007 रुपये प्रति किलो इतकी आहे. काल संध्याकाळी चांदीचा दर 49796 रुपये प्रति किलो इतका होता. या आठवठ्यात पहिल्यांदाच सोने व चांदीच्या दरात घसरण झाली असून सोन्याचे दर 47 हजाराच्या खाली आले आहेत.

आजच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊया. सोन्याचा दर  goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे. (Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 207,615 वर पोहचली; मागील 24 तासांत 8,909 नव्या रुग्णांची भर)

आजचा सोन्याचा दर:

 

शहर

24 करेट/प्रतितोळा

22 करेट/प्रतितोळा

मुंबई 47,150 रुपये

46,110 रुपये

पुणे

48,244 रुपये

45,964 रुपये

नाशिक

48,212 रुपये

45,912 रुपये

नागपूर

48,229 रुपये

45,969 रुपये

सोलापूर

48,265 रुपये

45,975 रुपये

 

कोरोना व्हायरस संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला आहे. कोरोनाचे संकट अद्याप भारतावर घोंगावत आहे. कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या वर गेला असून 5 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाचे संकट समोर उभे ठाकले आहे.