![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/11/hospital-ac.jpg?width=380&height=214)
मुंबई मध्ये आज पहिला Guiain-Barré Syndrome चा रूग्ण समोर आला आहे. बीएमसी कडून 64 वर्षीय महिला या दुर्मिळ नर्व्ह डिसऑर्डरची पहिली रूग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. GBS एक दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात, तसेच अन्न खाताना, गिळताना, श्वास घेताना त्रास होतो.
PTI शी बोलताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रूग्णावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पालिकेच्या हॉस्पिटल मध्येच रूग्णावर उपचार सुरू असून महिला अंधेरी पूर्व भागातील आहे. ताप आणि अतिसाराच्या त्रासाने तिला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला अर्धांगवायूचा त्रास झाला.
गंभीर प्रकरणांमध्ये, GBS रूग्णाला जवळजवळ पूर्ण अर्धांगवायू होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये या विकाराचा प्रादुर्भाव अधिक सामान्य आहे, तरी सर्व वयोगटातील लोक प्रभावित होऊ शकतात. नक्की वाचा: How To Prevent Guillain-Barre Syndrome: जीबीएस आजाराचा प्रसार टाळण्यासाठी काय कराल? पुणे महानगरपालिकेने जारी केली खास मार्गदर्शक तत्त्व .
पुण्यात जीबीएस चे अधिक रूग्ण आहेत. सुमारे 173 रुग्णांपैकी 72 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, 55 आयसीयूमध्ये आहेत आणि 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
जीबीएस च्या पहिल्या लक्षणांमध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येणे यांचा समावेश होतो. ते सहसा पायांपासून सुरू होतात आणि हात आणि चेहऱ्यावर पसरू शकतात. काही लोकांसाठी, या लक्षणांमुळे पाय, हात किंवा चेहऱ्यावरील स्नायूंचा पक्षाघात होऊ शकतो अशी माहिती WHO ने दिली आहे. WHO च्या माहितीनुसार, बहुतेक लोक जीबीएसच्या सर्वात गंभीर रूपामधूनही पूर्णपणे बरे होतात, तर काहींना अशक्तपणा जाणवत राहतो.