LPG Cylinder | (File Image)

LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाइटनुसार 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) कमी केले आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आता नवीन दर लागू झाले आहे. ज्यात मुंबईत सिलिंडर 31 रुपये स्वस्त झाला आहे. त्यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1598 रुपये इतकी झाली आहे. (हेही वाचा:Snake Video: जिप्सी चालकाच्या शर्टात लपून बसला होता साप, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल)

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर आता 1648 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर 1840.50 रुपयांऐवजी 1809.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 31 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर 1756 रुपये इतके झाले आहेत. आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 150 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीत. 9 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थेच होते.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी 802रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास 300 रुपयांनी कपात केली आहे.