Gas Cylinder Explosion In Tamilnadu: तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील पासियापेट्टा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आग लागली. रेस्टॉरंटजवळील फटाक्याच्या गोदामातही आग पसरली, त्यानंतर परिसरात मोठा स्फोट झाला. वृत्तानुसार, रेस्टॉरंटमध्ये जेवणारे लोक या आगीत अडकले ज्यात किमान सहा जण या आगीत होरपळून मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. काही क्षणातच ही आग भडकली. लोकांनी आरडाओरड केल्यावर परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक स्फोटांमुळे लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
जास्त लोकवस्तीच्या परिसरात फटाके फोडण्याची परवानगी कशी देण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. जिल्हाधिकारी सरयू आणि पोलिस अधीक्षक सरोज कुमार यांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरात या दुर्घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णायलात गंभीर जखमेत असलेल्या लोकांवर उपाचार सुरु आहे.
#WATCH | Few people feared dead in explosion in firecrackers factory in Krishnagiri district of Tamil Nadu; further details awaited pic.twitter.com/cOImAJy35y
— ANI (@ANI) July 29, 2023