Ganpati Visarjan 2024: विसर्जनाच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर भाविकांची आफाट गर्दी असते, या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागते. १७ तारखेला मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganpati Visarjan) करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई 23,400 पोलीस कर्मचारी () बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 2,900 पोलीस अधिकारी आणि 20,500 पोलीस कर्मचारी देखील विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्ताकरीता सज्ज असणार आहेत. (हेही वाचा : Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: पाच दिवसीय गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप!)
यासोबतच 40 पोलीस उप-आयुक्त (डीसीपी) आणि 50 सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बंदोबस्तासाठी तैनात असतील. मुंबईत पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ असावे याकरिता राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक यांची देखील मदत घेतली जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहरातील संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असेल. यासोबतच मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि ड्रोन कॅमेरांनी देखील विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. यासोबतच महिला आणि बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. (हेही वाचा : Ganesh Visarjan 2024 Wishes in Marathi: गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप!)
विसर्जनादरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांपासून सगळे वरिष्ठ अधिकारी असणार ग्राउंड झीरोवर असतील. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पोलिसांचं विशेष सुरक्षा कवच पुरवले जाणार आहे.