31 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेशोत्सवामध्ये दीड, पाच, सात,सहा आणि दहा दिवसांनी घरोघरी स्थापन झालेल्या गणपतीचं विसर्जन सुरू झाले आहे. या गणेश विसर्जनाची तयारी बीएमसी कडूनही करण्यात आली आहे. यंदा 2 वर्षांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणामध्ये केले जात असल्याने विसर्जनाची मिरवणूक आणि सार्वजनिक विसर्जन ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं विसर्जन आर्टिफिशिअल तलावांमध्ये करण्याचं आवाहन केले आहे. त्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती पालिकेनेही केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या माहितीनुसार, 162 कृत्रिम तलावं आणि 73 नैसर्गिक विसर्जन स्थळं तयार ठेवण्यात आली आहेत.ANI सोबत बोलताना Assistant Municipal Commissioner Ramakant Biradar यांनी दिलेल्या माहितीनुसार, विसर्जन स्थळी लाईफगार्ड्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. सारी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशी म्हणजे 9 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबई मध्ये काल दीड दिवसांच्या गणेश विसर्जन मध्ये 22,687 मूर्त्यांचं विसर्जन झाले आहे. हे कृत्रिम तलावांमध्ये झालेले विसर्जन आहे.