Maoists । X @ANI

गडचिरोली (Gadchiroli) मध्ये एकूण 40 लाख रूपयांचे बक्षीस असलेल्या आणि सी-60 मधील कमांडोला ठार मारण्यात सहभागी असलेल्या चार कट्टर माओवाद्यांना (Maoists)  शनिवार 19 एप्रिल दिवशी सीआरपीएफ  आणि गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकार्‍याने दिली आहे.  सैलु मुद्देला उर्फ ​​रघु (55), त्याची पत्नी जैनी खरातम उर्फ ​​अखिला (41), तसेच झांसी तलांडी उर्फ ​​गंगू आणि मनिला गावडे उर्फ ​​सरिता (21) यांना ताडगाव पोलिस स्टेशन आणि सीआरपीएफच्या 9 व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

मुद्देला उर्फ ​​20 लाख रुपयांचे बक्षीस होते, तर खराताम उर्फ ​​16 लाख रुपये होते. तलांडी आणि गावडे यांच्यावर प्रत्येकी 2 लाख रुपये बक्षीस आहे.

पोलिसांनी अटक केलेले माओवादी भामरागड उपविभागाचा भाग असलेल्या ताडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील पल्ली येथील जंगलात संशयास्पदरित्या फिरत होते. हल्ल्यासाठी ते काही जागा शोधत होते. दरम्यान 11 फेब्रुवारी 2025 दिवशी दिरंगी-फुलनार वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत सी-६० कमांडोच्या हत्येत या चौघा माओवाद्यांचा थेट समावेश होता. अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

पोलिस अधिक्षक कार्यालयामधून प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये , सैलू मुद्देला उर्फ ​​रघू हा बेकायदेशीर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) दक्षिण गडचिरोली विभागाचा भाग होता, जैनी खरातम उर्फ ​​अखिला भामरागड एरिया कमिटीमध्ये होता, तर झांसी तलांडी उर्फ ​​गंगू आणि मनिला गावडे हे एल.भमरागड विभागाचा सदस्य असल्याचं समोर आले आहे.

सैलू मुद्देला हा 77 प्रकरणांमध्ये सहभागी होता, ज्यामध्ये 34 चकमकी, जाळपोळीच्या सात घटना, 23 खून यांचा समावेश आहे. खरातम याचे नाव 29 प्रकरणांमध्ये आहे, ज्यामध्ये 18 चकमकी, जाळपोळीच्या तीन घटना आणि चार खून यांचा समावेश आहे. नक्की वाचा:   गडचिरोलीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती; 2024 मध्ये 24 नक्षली ठार, तर 18 माओवाद्यांना अटक .

"झान्सी तलांडी, एकूण 14 गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे, ज्यामध्ये 12 एन्काउंटर आणि एका हत्येचा समावेश आहे. मनिला 10 गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. यामध्ये चार खून आणि पाच एन्काउंटर आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.