Gadchiroli Matdarsangh (Photo Credits: Representative)

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास 76% जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थक लोक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 14,414 चौ.कि.मी आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो. गडचिरोली जिल्ह्यात एक लोकसभा मतदार संघ असून 3 विधान सभा क्षेत्रे आहेत. लोकसभा क्षेत्राचे नाव गडचिरोली-चिमूर असून मुख्यालय गडचिरोली आहे. या लोकसभा मतदार संघात गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी 3 विधान सभा मतदार संघ आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विधान सभा मतदार संघ अनुक्रमे चिमूर व ब्रम्हपुरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ अनुक्रमे आमगाव अंतर्भूत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली विधानसभा मतदारसंघ आहे. या जिल्ह्यात 2014 च्या जनगणनेनुसार, 2,38,937 एकूण मतदार आहेत; त्यात 1,22,386 पुरुष मतदार 1,16,551 महिला मतदार आहेत. डॉ. देवराव होळी गडचिरोलीचे विद्यमान आमदार आहेत. 2014 साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर गडचिरोली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला. डॉ. देवराव हे उच्चशिक्षित आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला होता. .यंदा पुन्हा डॉ. देवराम विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमवणार असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे चंद्रा कोडावते यांची लढत चांगलीच रंगणार आहे.  Maharashtra Assembly Elections 2019: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स

गडचिरोली विधानसभा निवडणूक 2014 निकाल

१) डॉ. देवराव होळी, भाजप – 70,185

२) श्रीमती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी – 18,280

३) श्रीमती सगुणा तलांडी, काँग्रेस – 17,208

४) केसरी उसेंडी, शिवसेना – 14,892

त्याचबरोबर अहेरी हा देखील गडचिरोली मधील विधानसभा मतदारसंघ आहे. 2014 साली भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम हे 56,418 मतांनी निवडून आले होते. आत्राम हे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यावर्षी आत्राम विरुद्ध काँग्रेसचे दीपक आत्राम आणि वंचित बहूजन समाजाचे लालूस नागेटी रिंगणात उतरले आहेत.

अहेरी (Aheri) मतदारसंघातील विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

1) राजे आम्ब्रीशराव आत्रम, भाजप – 56,418

2) धर्मरावबाबा आत्रम, राष्ट्रवादी – 36,507

3) दिपकदादा आत्रम, अपक्ष – 33,560

4) मुक्तेश्वर गावडे, काँग्रेस – 4,253

5) रघुनाथ तलांडे, बसप – 3,737

वैनगंगा नदीकाठी वसलेले आरमोरी शहर हा गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. 2014 साली कृष्णा गजबे हे आरमोरी विधानसभाम मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 साली त्यांनी पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दणदणीत विजय झाला होता. यावर्षी म्हणजेच 2019 मध्ये गजबे विरुद्ध काँग्रेसचे आनंदराव गेडाम ही लढत रंगणार आहे.

आरमोरी (Armori) विधानसभा निवडणूक 2014 निकाल

1) कृष्णा गजबे, भाजप – 60,413

2) आनंदराव गेडाम, काँग्रेस – 47,680

3) श्रीमती कोमल बारसागडे, बसप – 15,697

4) रामकृष्ण मडावी, शिवसेना – 14,224

5) जयेंद्रसिंह चंदेल, अपक्ष – 9490

थोडक्यात गडचिरोलीतील तिन्ही मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यंदाही हे चित्र कायम राहते की काँग्रेस पक्ष हे चित्र बदलून टाकेल हे येत्या 24 ऑक्टोबरला कळेल.