diesel | PC: Pixabay.com

मुंबई (Mumbai)  मध्ये आता इंडीयन ऑईल कॉर्परेशन (Indian Oil Corporation) कडून Humsafar India आणि Okara Fuelogics यांच्या साथीने डिझेल घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना FUEL HUMSAFAR या अ‍ॅप ची मदत होणार आहे. आता हमसफर या अ‍ॅप बेस्ड घरपोच डिझेल डिलेव्हरी सर्व्हिस मुळे शेतकरी, हाऊसिंग सोसायटी, हॉटेल, हॉस्पिटल, मॉल, कंस्ट्रक्शन साईट्स, इंडस्ट्री, बॅक्वेस्ट्स आणि अन्य मोठ्या प्रमाणात डिझेल घेणार्‍यांना त्याचा फायदा घेता येणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई सोबतच ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर आणि अन्य शहरांमध्ये ही घरपोच डिझेल पुरवण्याची सुविधा लॉन्च करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

दरम्यान डिझेल पोहचवण्यासाठी फिरणारा ट्रक हा जीओफेन्सिंग़ तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल यामुळे इच्छित स्थळी पोहचे पर्यंत तो लॉक असएल. यासोबतच फायर एक्सटिंव्हिशर त्याच्यासोबत असणार आहे. पुरेशी सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल. दरम्यान डिझेल हे त्या दिवशीच्या किंमतीनुसार, टॅक्स सह ज्या दरात असेल त्याच दरात विकले जाणार आहे.

सध्या देशात हमसफर द्वारा एनसीआर, राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, कानपूर, अलाहाबाद आणि गाजियाबाद मध्ये सर्व्हिस दिली जात आहे.

इंडियन ऑईल प्रमाणेच काही दिवसांपूर्वीच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कडून देखील डिझेलची घरपोच डिलिव्हरी करायला सुरुवात झाली आहे. त्यांनी ग्राहकांना किमान 20 लीटर डिझेलची ऑर्डर देणे बंधनकारक आहे. अशी अट दिली आहे.