Marriage | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

मॅट्रिमोनी साइटच्या (Matrimony Site) माध्यमातून मनासारखा जोडीदार शोधण्याच्या नादात मुंबईतील एका महिलेला (Mumbai Woman ) चक्क 2.77 लाख रुपयांचा भुर्दंड (Fraud For Marriage) बसला आहे. एका खासगी बँकेत सेल्स विभागाची प्रमुख असलेल्या या महिलेने आता पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीत मह्टले आहे की, मॅट्रिमोनी साइटवर तिने प्रोफाईल तयार केले होते. हे प्रोफाईल पाहून तिला अजय खुराना नामक व्यक्तीने मेसेज पाठवले. लवकरच त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि व्हॉट्सअॅपवर (WhatsApp बोलणे सुरु झाले. खुराना हा एका यूएस-आधारित टेलिकॉम कंपनीमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून कथीतरित्या काम करतो.

तक्रारदार महिला आणि तो खुराना नामक व्यक्ती यांच्यातील संवाद बराच पुढे गेला. एक दिवस आपण तिला (तक्रारदार महिला) भेटायला भारतात येत असल्याचे त्याने सांगितले आणि तिच्या व्हॉट्सअॅपवर तिकीटही पाठवले. महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. दमरम्यान, आरोपीने (खुराना) 12 डिसेंबर रोजी पहाटे 5.00 वजता महिलेला मेसेज पाठवला की आपण मुंबई विमानतळावर आलो आहोत. पण, काही कारणांमुळे सकाळी 9 वाजेपर्यंत आपण विमानतळ सोडू शकत नाही. या मेसेजनंतर सुरु झाला फसवणुकीचा खेळ. (हेही वाचा, प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, 12 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजता महिलेने पुन्हा मेसेज पाठवला की, त्याने सोबत पाच लाख रुपयांची रोख रक्कम आणली आहे. ही रक्कम असल्याने त्याला विमानतळावर पकडण्यात आले आहे. त्यामुळे सुटकेसाठी त्याला 42,000 रुपये द्यावे लागणार आहेत. महिलेने त्याला दिलेल्या खाते क्रमांकावर 42 हजार रुपये ट्रान्सफर केले. यानंतर श्री खुराणा यांने तिला पुन्हा मेसेज केला की कस्टम अधिकारी त्याला त्यावर २.५% जीएसटी भरण्यास सांगत आहेत आणि त्यामुळे त्याला आता अधिकचे 2.35 लाख रुपये अधिक हवे आहेत. विश्वास ठेऊन महिलेने ही रक्कम भरली.

दरम्यान, पैसे मागण्याची त्याची भूक अजूनही थांबलीच नव्हती. थोड्याच वेळात खुराना यांने महिलेला पुन्हा मेसेज केला आणि सांगितले की विमानतळ अधिकारी त्याला सोडण्यासाठी 6.80 लाख रुपये मागत आहेत. त्याने सातत्याने पैसे मागणे सुरुच ठेवल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे तिच्या आले आणि तिने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीस सांगितले की, अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.