Anant Tare Passes Away: ठाणे (Thane) शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनंत तरे (Anant Tare) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या 67 व्या वर्षी अनंत तरे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सुन, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. अनंत तरे यांच्यावर उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते. त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौरपद भूषविले होते. एवढेच नव्हेतर, 2000 ते 2006 या दरम्यान विधानपरिषदेवर आमदार होते. तसेच कोरोना समाजाचा मोठा नेता म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय, एकविरा देवी ट्रस्टचे देखील ते अध्यक्ष होते. शिवसेनेने 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी वर्णी लावली होती. हे देखील वाचा- I Am Responsible: 'मी जबाबदार' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नवीन मोहिमेची घोषणा
ट्विट-
#ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते #अनंत_तरे यांचे निधन. उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.@Info_Thane1 pic.twitter.com/SiKWy0Iumd
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) February 22, 2021
अनंत तेरे हे शिवसेना प्रमुख हिंदूहृयदसम्राट बाळासाहेब थोरात यांचे खास होते. अनंत तेरे यांच्या जाण्याने सर्वत्र शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे.