Pradeep Sharma: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप, लखन भय्या बनावट चकमकी प्रकरणी शिक्षा
Pradeep Sharma | Twitter

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा ही मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता. (हेही वाचा - IT Raid on Encounter Specialist Pradeep Sharma: करचोरी प्रकरणी आयकर विभागाची एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी)

लखन भैया (33, रा. वसई), खरे नाव रामनारायण गुप्ता असून, त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचा सामना पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे झाला. या कथित बनावट चकमकीचे नेतृत्व माजी चकमकी फेम प्रदीप शर्मा यांनी केले होते.

पाहा पोस्ट -

2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर चकमक प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या अपीलांवर सुनावणी झाली.